Welcome to Souq Ecommerce Store !
राज्याच्या या भागांमध्ये उद्यापासून एसटी धावणार, पाहा काय आहेत अटी, marathi news today
मुंबई माझा महाराष्ट्र वृत्तसेवा: 
              कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे बंद असलेली एसटी पुन्हा एकदा रस्त्यावर दिसू लागणार आहे. उद्या म्हणजेच २२ मेपासून रेड झोन आणि कंटेनमेंट झोन वगळता जिल्हा अंतर्गत एसटी बससेवा सुरू होणार आहे, पण या बससेवेसाठी काही अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. 
२३ मार्च म्हणजेच लॉकडाऊनपासून दोन महिने मुंबई आणि उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. पण लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्य सरकारने रेड झोन आणि कंटेनमेंट झोन वगळता अटी-शर्तींसह जिल्हाअंतर्गत एसटी बस सुरू करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्यापासून निवडक मार्गांवर एसटी बससेवा सुरू होणार आहे. 

काय आहेत अटी-शर्ती? 

१. जिल्हा-अंतर्गत सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत हि बस सेवा सुरु राहील.

२. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.

३. सोशल डिस्टंसिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल. 
 
४. जेष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून ) 
 
५. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना  सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.   
 
६. प्रवासामध्ये प्रत्येक  प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.



                                          Join whatsapp group for daily updates

                                                                          click here

Clothing & Apparel:

Jewelry & Watches:

Health & Beauty: